मराठी चॅनेलवर पहिल्यांदाच दिसेल 'हवीहवीशी प्रेमळ इच्छाधारी नागीण'



माय नगर वेब टीम
मुंबई - एक आगळीवेगळी मालिका 'प्रेम, पॉयझन, पंगा' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका २८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. प्रोमो बघूनच, प्रेक्षकांची मालिकेविषयीची उत्सुकता वाढलेली आहे. 'इच्छाधारी नागीण' हा विषय मराठी मालिकाविश्वात पहिल्यांदाच हाताळण्यात येत आहे.

'कोठारे व्हिजन' या मालिकेची निर्मिती करत आहे. 'इच्छाधारी नागीण' म्हणजे नकारात्मक भूमिका, हे समीकरण बदलून, एक हवीहवीशी प्रेमळ नागीण या मालिकेत पाहायला मिळणार आहे. मुख्य भूमिकेतील कलाकार म्हणून, दोन नवे चेहरे शरयू सोनावणे आणि करण बेंद्रे यांची जोडी या मालिकेत पाहायला मिळतील. या मालिकेत व्ही. एफ. एक्स. तंत्रज्ञानाचा फार महत्त्वाचा वाटा असणार आहे.


त्या विषयी बोलताना आदिनाथ कोठारे म्हणाले, ''इच्छाधारी नागीण हा विषय असल्यामुळे स्क्रीनवर नागीण दाखवणे हा मुख्य मुद्दा ठरतो. यासाठीच व्ही. एफ. एक्स तंत्राचा वापर करावा लागतो. 'थ्रीडी' अॅनिमेशन करण्यासाठी प्रतिभावंत व्ही. एफ. एक्स. कलाकार लागतात. खूप वेळ आणि पैसेसुद्धा यासाठी खर्च होतात. मालिकेच्या डेडलाइन सांभाळून हे सगळं करणं, हे मोठं आव्हान होतं.''

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post