कोपरगाव - राज्यशासनाने पश्चिमेचे समुद्राला वाहुन जाणारे पाणी पुर्वेकडे वळवुन गोदावरी खोर्यातील पाण्याची तुट भरून काढण्यासाठी राज्यशासनाने संपुर्ण आराखडा तयार केला आहे. लवकरच या कामाचे टेंडर निघणार असून या निर्णयामुळे मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील भाजप, शिवसेना महायुतीच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोपरगावमध्ये सभेप्रसंगी बोलत होते. यावेळी ते म्हणाले कि, या निर्णयानंतर नगर नाशिक जिल्ह्यातील धरणाच्या पाण्यावरून होणारा संघर्ष थांबणार आहे. नगर नाशिक जिल्ह्यातील शेती, पिण्याचा पाण्याचा प्रश्नही कायमचा मार्गी लागेल असे अश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री शंकरराव कोल्हे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. स्नेहलता कोल्हे, खा. सदाशिव लोखंडे, बिपीनराव कोल्हे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment