भाजप सरकारच्या काळात नगर-राहुरी मतदारसंघासाठी सर्वाधिक निधी मिळाला - आ. कर्डिले


माय नगर वेब टीम

अहमदनगर - भाजप सरकारने सुरु केलेली जलयुक्तशिवार योजना ही जिरायत भागासाठी वरदान ठरली आहे. राज्यावर जेव्हा-जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा भाजप सरकारने ते सोडविण्याचे काम केले आहे. गतवर्षी राज्यावर दुष्काळाचे मोठे संकट आले होते तेव्हा या सरकारने सक्षमपणे तोंड दिले. जनावरांच्या छावण्या व पाण्याचे टँकर सुरु केले. शेतकर्‍यांचे पशुधन वाचविण्याचे काम केले. राहुरी-नगर-पाथर्डी मतदार संघासाठीही या सरकारने सर्वाधिक निधी उपलब्ध करुन दिला आहे असे प्रतिपादन भाजपाचे उमेदवार आ.शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

पाथर्डी तालुक्यातील कोल्हार, शिराळ चिचोंडी, डमाळवाडी, गितेवाडी, डोगरवाडी, धारवाडी, राघुहिवरे, लोहसर, खांडगाव, जोहारवाडी, पवळवाडी, वैजू बाभुळगाव, भोसे, दगडवाडी आदी गावांमध्ये आ.कर्डिले यांनी झंझावती प्रचार दौरा केला त्यावेळी मतदारांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम आठरे, पं.स.सदस्य एकनाथ आटकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाळासाहेब अकोलकर, वैभव खलाटे, संतोष शिंदे, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख रफिक शेख, सरपंच काळु मिरपगार, मिर्झा मनियार, बाबाजी पालवे, शिवाजी गर्जे, शिवाजी पालवे, रेवनाथ पालवे, अशोक पालवे, संतोष पालवे, सोपान पालवे, राहुल गवळी, जिजाबापु लोंढे, जालिंदर लोंढे, रामदास गोरे, साहेबराव गवळीख, शिवाजी गवळी, भाऊसाहेब आठरे, अशोक दहातोंडे, मच्छिंद्र सावंत, शंकर शिरसाठ, वांढेकर महाराज, बाळासाहेब वाघ, विजयाताई सोलाट, विलास मुखेकर, पांडुरंग झिने, राजेंद्र कोरडे, दिपक गवळी, छबुराव मुळे, जालिंदर गवळी, राहुल अकोलकर, रेवणनाथ कोरडे, बबन गायकवाड, बबुभाई शेख, उद्धव गिते, बापुराव गोरे, उद्धव काळापाड, सचिन शिंदे, नवनाथ आटोळे, सुखदेव जाधव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेली 25 वर्षे जनतेसाठी संघर्ष करण्याचे काम केले आहे. विकासाचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. सरकारने अनेक योजना मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी विविध विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा मतदार संघाचा आमदार होण्याचे भाग्य कै.गोपिनाथ मुंडे यांच्यामुळे लाभले आहे असेही यावेळी आ.शिवाजीराव कर्डिले म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post