माय नगर वेब टीम
अहमदनगर - रविवारी रात्री ७ च्या सुमारास खडकी आणि परिसराला वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाचा तडाखा बसला. खडकी तील ५० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील संत्रा बागांना फटका बसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.
खडकी सह, बाबूर्डी बेंद, खंडाळा, धोंडेवाडी, जाधववाडी या भागात संत्रा फळबागांचे प्रमाण मोठे आहे. एकट्या खडकीमध्ये १०० हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर संत्रा फळबागा लागवड आहे.मागील वर्षी च्या कडक दुष्काळातही टँकरने पाणी घालून कसे बसे फळबागा जगवल्या आहेत. त्यासाठी एकरी दीड ते दोन लाख खर्च केलेला आहे. अद्यापही पाऊस पुरेसा नसल्याने टँकर सुरूच आहेत. त्यातच रविवारी संध्याकाळी ७ वाजता गारा सह वादळी पाऊस झाला. त्यात मोठ्या प्रमाणात फळे गळाले. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले.
लाखो रुपयांचे नुकसान झाले,
पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी
दुष्काळी परिस्थिती असताना टँकर पाणी घालून बागा जगवल्या. अजूनही पाऊस पुरेसा नाही.अजूनही टँकर सुरू आहेत.लाखो रुपये पाण्यावर खर्च झाला आहे.आणि त्यात गारांचा पाऊस झाल्याने मोट्या प्रमाणात फळे गळाली. खूप मोठे नुकसान आले आहे, पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी
- भारत निकम खडकी

Post a Comment