अ‍ॅलिसाच्या 61 चेंडूंत 148 धावा



माय नगर वेब टीम
नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाची फलंदाज अ‍ॅलिसा हिली हिने महिला क्रिकेटमध्ये दमदार खेळी करत विक्रम केला. टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामन्यात तिने केवळ 61 चेंडूत नाबाद 148 धावांची खेळी केली. तिने महिला टी-20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम स्वतःच्या नावावर केला.

ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील तिसर्‍या टी- 20 सामन्यात अ‍ॅलिसाच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 2 बाद 226 धावा ठोकल्या. तिने 148 धावांची नाबाद खेळी करताना विश्वविक्रम नावावर केला. अ‍ॅलिसाने 61 चेंडूंत 19 चौकार व 7 षटकार खेचले. यासह तिने महिला टी- 20 इतिहासातील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रम केला. या आधी या विक्रम ऑस्ट्रेलियाच्याच मेग लॅनिंगच्या (133*) च्या नावे होता. तिने इंग्लंड विरुद्ध याच वर्षात हा विक्रम केला होता. या शिवाय, अ‍ॅलिसाने इतरही काही विक्रम मोडले. महिला क्रिकेटमध्ये अ‍ॅलिसाने सलग 72 सामने खेळले. यासह तिने दक्षिण आफ्रिकेच्या मिग्नन ड्यू प्रीझ हिचा 71 सामन्यांचा विक्रम मोडला. या विक्रमात पाकिस्तानची सना मीर 73 सामन्यांसह आघाडीवर आहे. तसेच अ‍ॅलिसाने महिला टी- 20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वात जलद शतकदेखील ठोकले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post