बहुपयोगी कॅमेरा




माय नगर वेब टीम
रात्रीच्या वेळेस नभांगण तार्‍यांनी प्रकाशमान झालेले असते. पण या तार्‍यांविषयी आपल्याला माहीत नसते. मोजके तारे सोडले तर आपली इतर तारामंडळाशी फारशी ओळख नसते. अशावेळेस स्मार्टफोनचा कॅमेरा मदतीला येऊ शकतो. स्काय व्ह्यू नावाचे अ‍ॅप इन्स्टॉल करा. त्यानंतर यातून कॅमेरा उघडून आकाशाच्या दिशेने करा. यातून तुम्हाला तारेही समजतील आणि टेलिस्कोपशिवाय ते पाहण्याचा अनंदही घेता येईल.

व्हिज्युअल सर्च : गुगलच्या गॉगल्ससारख्या अ‍ॅपचा वापर करून तुम्ही फोटोवरून काही सर्च करू शकता. जर एखाद्या वस्तूचा फोटो घेतला असेल तर त्यावरून ती वस्तू तुम्हाला सहज शोधता येऊ शकते. तसेच यातील टेक्स्ट (मजकुराबाबतही) काही माहिती यातून मिळू शकते.

बारकोड स़्कॅनिंग : स्मार्टफोनच्या कॅमेराचा वापर करून तुम्ही बारकोड किंवा क्युआर कोड स्कॅन करू शकता. अनेक वस्तूंवर आपण बारकोड असल्याचे पाहतो. त्या वस्तूची अधिकृत आणि सविस्तर माहिती हा बारकोड स्कॅन केल्यानंतर मिळू शकते. काही फोन्समध्ये हे स्कॅनर आधीच इन्स्टॉल केलेले असतात, तर काहींमध्ये त्यासाठीची अ‍ॅप्स डाऊनलोड करावी लागतात. बारकोड स्कॅनर, क्युआर कोड स्कॅनर अशा नावाने अ‍ॅप स्टोअरमध्ये सर्च केल्यानंतर अनेक अ‍ॅप्स तुम्हाला मिळू शकतील.

सिक्युरीटी कॅमेरा : जुन्या स्मार्टफोनला सिक्युरीटी कॅमेरा बनविण्याची शक्कल लोकांना चांगलीच आवडल्याचे दिसत आहे. यासाठी सिक्युरीटी कॅमेरा अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर या जुन्या फोनला वायफायवर कनेक्ट करून अपेक्षित जागेवर ठेवले की झाला तुमचा सिक्युरीटी कॅमेरा तयार. मात्र, हे करत असताना त्याला सतत एक चार्जिंगची वायर जोडलेली असायला हवी, हे विसरू नका. या कॅमेराचा वापर करून तुम्ही ऑनलाईन कुठुनही याचे लाईव्ह  बघू शकता.

जागांबद्दलही विशेष माहिती : तुम्ही जर कॅमेरात आपल्या आसपासच्या लोकेशन्स पिन करून ठेवल्या तर त्याबाबतची माहिती देखील तुम्हाला मिळू शकेल. येल्प किंवा लेयर ही अ‍ॅप्स अशा प्रकारे काम करतात. यामध्ये कॅमेरामध्ये ती लोकेशन दिसू लागली की आपोआपच त्याची माहिती आपल्यला मिळू लागते.

अनुवाद करा : भारतासारख्या देशात अनेक राज्यांच्या त्यांच्या वेगळ्या भाषा आहेत. विशेषतः दक्षिणेकडील राज्यांमध्ये गेल्यास मोठमोठाले फलक किंवा सूचनाफलक वाचताना आपली अडचण निर्माण होते. अशा परीस्थितीतूनही हा कॅमेरा आपल्याला मार्ग काढून देऊ शकतो. यासाठी तुम्हाला गुगल ट्रान्सलेट हे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर जेव्हा असा एखादा न वाअचता येणारा बोर्ड दिसेल तेव्हा हे अ‍ॅप उघडून कॅमेराच्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर हा कॅमेरा त्यावर रोखून धरल्यानंतर आपोआपच अनुवादित मजकूर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर दिसू लागेल. यामध्ये शेकडो भाषांचे पर्याय उपलब्ध आहेत. गुगल हे अनुवादाचे काम उत्तमरीत्या पार पाडते. मात्र, हे सर्व फिचर्स वापरण्यासाठी चांगले इंटरनेट कनेक्शन असायला हवे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post