मोबाईलचा ग्राहक कमालाची चोखंदळ




माय नगर वेब टीम
भारतातील मोबाइल ग्राहक चोखंदळ आहे. त्याला पैशाच्या कमाल मूल्याची सेवा हवी असते. या बाबी ध्यानात घेऊन वन प्लस कंपनीने आपली उत्पादने विकसित केल्यामुळे गेल्या पाच वर्षात कंपनीने बाजारपेठेतील मोठा हिस्सा मिळविला आहे. वन प्लस इंडियाचे महाव्यवस्थापक विकास अगरवाल यांनी सांगितले की, कंपनीने मेक इन इंडियावर भर देऊन जागतिक पातळीवरील दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून दिली.

हीच उत्पादने निर्यात केली जाऊ शकतात. कंपनीने केवळ उत्पादनच नाही तर संशोधन आणि विकास केंद्रही हैदराबाद येथे चालू केले आहे. त्यामुळे डिझायनिंगपासून उत्पादनापर्यंत कंपनीचे काम भारतात चालते. पुण्यासह भारतातील मोठ्या शहरातून कंपनीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. उत्पादनाच्या देखभालीसाठी ऑफलाइन एक्सपिरीयन्स सेंटर विकसित करण्यात येत आहेत. पुणे बंगळुरू दिल्ली येथील एक्सपिरीयन्स सेंटरला तरुण ग्राहकाकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. लवकरच 5जी फोनचे युग अवतरणार आहे. याचीही तयारी वन प्लसने केली आहे.

अगोदरच युरोपमध्ये 5 जी फोन सादर करण्यात आले असून भारतात एअरटेल आणि जिओसोबत प्रायोगिक तत्त्वावर काम चालू आहे. भारतात 5जी साठी पायाभूत सुविधा निर्माण झाल्याबरोबर आम्ही हँडसेट उपलब्ध करू, असे अगरवाल म्हणाले. प्रीमियम सेगमेंटमध्ये मोबाइल उद्योग 20 टक्के दराने वाढत आहे. मात्र वन प्लसची वाढ 60 टक्क्यांवर आहे. भारतातील डिजिटायझेशन आणि तंत्रज्ञान हाताळणारा तरुण वर्ग, त्याचबरोबर वेगाने विकसित होणार्‍या ई- कॉमर्समुळे विेशासार्ह आणि दर्जेदार फोनची मागणी आगामी काळात वाढणार आहे.

केवळ पाच वर्षात प्रीमियम सेगमेंटमध्ये वन प्लसने बाजारपेठेतील सर्वात मोठा हिस्सा मिळविला आहे. ग्राहकाकडून फोनसाठी उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर ही कंपनी स्मार्ट टीव्ही भारतामध्ये उपलब्ध करण्याची तयारी करीत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post