जनता शिवसेनेच्या पाठीशी - अनिल राठोड
माय नगर वेब टीम
अहमदनगर- नगरच्या जनतेला हे माहित आहे की त्यांच्या अडचणी त्यांचे प्रश्न हे बिनधास्तने शिवसेने पुढे मांडू शकतात. जनतेच्या कोणत्याही अडचणीला शिवसेना-भाजप सोडवण्यास सक्षम आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरीही जनता शिवसेनेच्या पाठीशी आहे असे प्रतिपादन उमेदवार अनिल राठोड यांनी केले.
महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांचे प्रथम अर्थ भुसार मार्केट यार्ड भागात प्रचार फेरी काढून जनतेशी संवाद साधला. यावेळी माजी खासदार दिलीप गांधी. अभय आगरकर, सुवेंद्र गांधी, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, मेहुल भंडारी, समीर बोरा, शैलेश गांधी, वृषभ भंडारी सह सर्व माहिती चे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते.
याप्रसंगी दिलीप गांधी म्हणाले केंद्रामध्ये भाजपा शिवसेनेचे युतीचे सरकार आहे. आणि महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे. जर नगर शहरातून शिवसेनेचे अनिल राठोड यांना आपण विजयी करून विधानसभेवर पाठवले तर सत्तेतला आमदार या नगर शहरात असेल आणि आपल्याला मंत्रिपद मिळू शकते. त्यामुळे नगर शहरात अखंड विकास कामे होण्यासाठी आलेली संधी नगरकरांनी सोडू नये.

Post a Comment