अभिनेता संजय नार्वेकर वेब सीरिजमध्ये झळकणार


माय नगर वेब टीम
अभिनेता म्हणजे संजय नार्वेकर पहिल्यांदाच वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. कॅफेमराठी आणि शिवाय इंटरनॅशनल प्रस्तुत, अभिषेक पारीख, निखिल रायबोले आणि भूपेंद्रकुमार नंदन निर्मित या आगामी मराठी वेब सीरिजचे दिग्दर्शन प्रवीण राजा कारळे यांनी केले आहे. यात संजयसह स्मिता शेवाळे, विनय येडेकर, विजय गोखले, सुनील होळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

अनेक तरुण क्रिकेटर होण्याची स्वप्न उराशी बाळगतात. हाच विषय या वेब सीरिजमध्ये वेगळ्या प्रकारे साकारण्यात येत आहे. यात संजय नार्वेकर एका वेगळ्याच भूमिकेत दिसेल. संजय नार्वेकर सांगतो, ‘‘वेब सीरिजच्या रूपाने मी डिजिटल विश्वात पदार्पण करतो आहे. कॅफेमराठी टीमने जेव्हा मला ही गोष्ट ऐकवली होता, तेव्हाच मला ती आवडली होती.

आदित्य गावडे आणि अनुपम पुरोहित यांनी या गोष्टीला छान फुलवले आहे. मला देखील काम करताना खूप मज्जा आली. नाटक, सिनेमानंतर सर्वात वेगाने वाढणा-या डिजिटल माध्यमात मला काम करायला मिळाले, याचा मला आनंद वाटतो आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post