भारताचा २०३ धावांनी विजय
माय नगर वेब टीम
विशाखापट्टणम: भारताने कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर २०३ धावांनी दणदणीत मात करत मालिकेत १-० अशी विजयाची आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात मोहम्मद शमी (५/३५) आणि रवींद्र जडेजा (४/८७) यांनी सर्वाधिक बळी मिळवत भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी ९ बळींची आवश्यकता होती. लय सापडलेल्या टीम इंडियाने दिवसाच्या दोन सत्रांमध्येच हा विजय आपल्या नावे केला.
दिवसाच्या पहिल्याच सत्रात मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा यांच्या घातक फिरकी गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेचे एक मागोमाग एक असे ७ फलंदाज तंबूत धाडले. विजयासाठी केवळ दोनच बळी दूर असताना भारताने दुसऱ्या सत्रात २२ षटके फेकत या सामन्यावर आपले नाव कोरले.
Post a Comment