माय नगर वेब टीम
स्ट्रासबर्ग : जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर पाकिस्तानने थयथयाट करण्यास सुरुवात केली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनवगळता कोणत्याही देशाने पाकला पाठिंबा दिलेला नाही. आता युरोपीय महासंघाने देखील पाकिस्तानला खडेबोल सुनावले. पाकिस्तानात दहशतवाद्यांना संरक्षण दिले जात असून, ते शेजारी देशांत हल्ले घडवून आणतात, असे सांगतानाच त्यांनी भारताला पाठिंबाही दिला.
काश्मीरच्या मुद्यावर युरोपीय संघातही तब्बल ११ वर्षानंतर चर्चा झाली. त्यात अनेक सदस्यांनी पाकिस्तानवर सडकून टीका करतानाच भारताला पाठिंबा दिला. ‘भारतीय लोकशाही महान आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनांची आपण दखल घेतली पाहिजे. दहशतवादी हे चंद्रावरून येत नाहीत. ते शेजारी (पाकिस्तान) देशातून येतात. अशा वेळी आपण भारताला पाठिंबा दिला पाहिजे,’ असे मत पोलंडचे नेते आणि युरोपीय महासंघाचे सदस्य रिजार्ड जानेर्की यांनी व्यक्त केले.
‘पाकिस्तान अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी देत आहे. दहशतवादी पाकिस्तानात कट रचतात आणि युरोपमध्ये हल्ले घडवून आणतात,’ असा थेट आरोप इटलीचे नेते आणि महासंघाचे सदस्य फुलवियो मार्तुसिलो यांनी केला. काश्मीर मुद्यावर भारत-पाकिस्तानने चर्चा करायला हवी आणि शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Post a Comment