केडगावला जंगले महाराज शास्त्री यांच्या भागवत कथेचे आयोजन
माय नगर वेब टीम
अहमदनगर - रेणुकामातेची पावनभुमी असलेल्या अध्यात्मिक वारसा सांगणा-या केडगावात बुधवारपासून (9 ऑक्टोबर) 16 ऑक्टोबर पर्यंत गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या ओघवत्या वाणीतून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. नगर-पुणे रस्त्यावरील निशा लॉन येथे सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत होणार असून जंगले महाराज शास्त्री लिखित दृष्टांत सिद्धांत सार संग्रहाचे प्रकाशन बाळकृष्ण महाराज भोंदे यांच्या हस्ते होणार आहे.
श्रीक्षेत्र डोंगरगण येथील ज्ञानेश योग आश्रमाचे महंत जंगले महाराज शास्त्री यांच्या भागवत कथेसाठी संयोजकांनी जय्यत तयारी केली आहे. आश्रमातील शिष्यगणांच्या शिस्तबध्द व शास्त्रीय गायकांच्या संगीतमय व रसाळ वाणीतील भागवत कथा श्रवणाचा लाभ मिळवण्यासाठी केडगाव उपगरांमध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय आहे. या सोहळ्यात जंगले महाराज शास्त्री यांनी लिहिलेल्या दृष्टांत सिद्धांत या ग्रंथाचे ही प्रकाशन होणार आहे बाळकृष्ण महाराज मुंडे यांच्यासह अनेक संत महंत यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या भागवत कथेसाठी भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन केडगाव सप्ताह समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment