शहराला अधोगतीकडे नेणार्‍यांना नगरकरांनी जाब विचारावा : संतोष वाकळे




माय नगर वेब टीम
अहमदनगर - नगर शहरात वर्षानुवर्षे मूलभूत नागरी सुविधांपासूनही जनतेला वंचित रहावे लागत आहे. आलटून पालटून सत्तेत येणारे निवडणुका आल्या की विकासाच्या गप्पा मारतात. प्रत्यक्षात संधी मिळाल्यावर विकासकामांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नगरच्या रस्त्यांवर आज चंद्रावरही नसतील इतके खड्डे पडले आहेत. नगरची जनता खुप सहनशील व सोशिक आहे. या गोष्टीचा गैरफायदा घेवून सत्ताधारी व विरोधक आपली पोळी भाजून घेत आहेत. त्यांना जाब विचारण्याची वेळ आता आली आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वसामान्य नगरकरांचा हक्काचा आवाज बनणार आहे. नगरला अधोगतीकडे नेणार्‍यांना अजिबात थारा न देता राज ठाकरे यांच्या परखड विचारांना व विकासाच्या व्हिजनला साथ मिळेल, असा विश्वास नगर शहर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार संतोष नामदेव वाकळे यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगर शहर विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार संतोष नामदेव वाकळे यांच्या प्रचारार्थ शनिवारी बोल्हेगाव परिसरात रॅली काढण्यात आली. यावेळी नागरिकांशी संवाद वाकळे बोलत होते. या प्रचारफेरीत मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ,  जिल्हा सचिव नितीन भुतारे, जल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत, शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, महिला आघाडीच्या ऍड.अनिता दिघे, ऍड.नामदेव वाकळे, मनसे विद्यार्थी सेनेचे सुमित वर्मा, परेश पुरोहित, पोपट पाथरे, अशोक दातरंगे, अभिषेक मोरे, रतन गाडळकर, तुषार हिरवे, दीपक दांगट, अभिनय गायकवाड, गणेश शिंदे, अविनाश क्षेत्रे, अनिल धीवर आदींसह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मनसेच्या प्रचार फेरीचे परिसरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मतदारांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आताच्या प्रचारात मांडत असलेल्या भूमिकेचे स्वागत केले व नगरच्या समस्या सोडविण्यासाठी असाच विचार हवा, असे दिलखुलासपणे सांगितले. वाकळे पुढे म्हणाले की, नगरकर यावेळी नव्या चेहर्‍याच्या रूपाने बदल घडवतील असा विश्वास आहे. आपण कृतीशील विचारांच्या तरूणाईचे मोठे संघटन करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत. नगरच्या विकासाचा रोडमॅप आपण तयार केला आहे. तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जनतेने आवर्जून संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
नितीन भुतारे म्हणाले की, नगर शहरासह उपनगरांची नियोजनाअभावी वाट लागली आहे. उपनगरांचा वेगाने विस्तार होत असताना त्याठिकाणी पायाभूत सुविधा पुरवण्यात सत्ताधारी व विरोधकांनाही अपयश आले आहे. साधेसाधे विषयही मार्गी लावण्याची धमक व व्हिजन नसणारे आताच्या निवडणुकीत विकासाच्या मोठ्या वल्गना करीत आहेत. मनसेने अतिशय तरूण व शहरासाठी चांगले काम करण्याची तळमळ असलेला उमेदवार संतोष वाकळेंच्या रुपाने दिला आहे. त्यांना नगरकरांची चांगली साथ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post