मतदान केंद्रस्तरीय बीएलओ निवडणूकीतील मतदार चिठ्ठी वाटपासाठी कार्यमूक्त
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने केली होती मागणी
माय नगर वेब टीम
अहमदनगर: महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार चिठठ्या वाटपासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केद्रस्तरीय अधिकारी( बीएलओ ) यांना १७ ऑक्टोबर पर्यंत त्यांच्या मूळ आस्थापनेवरून कार्यमूक्त करण्यात आल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेन्द्र निमसे यांनी दिली .
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने उप जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले होते .मतदार चिठ्ठी वाटपासाठी दूरवर असणारी वाडी , वस्ती , पाडा उंच इमारती आदींमुळे बीएलओ यांना खूप अडचणी येतात. शाळेवर अध्यापन करून मतदार चिठ्ठी वाटप करणे शक्य नसल्याने बीएलओ यांना संबंधित शाळेवरून कार्यमूक्त करण्याची मागणी संघटनेने केली होती.
या मागणीची तात्काळ दखल घेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी व तालुक्याचे तहसिलदार यांना संघटनेने केलेल्या मागणीनूसार उचित कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.
या आदेशास अनुसरून संगमनेर शिर्डी पाथर्डी शेवगाव पारनेर सह सर्व विभागीय अधिकारी यांनी १२ते १७ ऑक्टोबर पर्यंत बीएलओ यांना त्यांच्या आस्थापनेवरून कार्यमुक्त करण्यात आले आहे.
या निर्णयामूळे जिल्ह्यातील बीएलओं मध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
या निर्णयाचे स्वागत राज्य उपसरचिटणीस कल्याण लवांडे, राज्य संघटक राजेंद्र निमसे, जिल्हा नेते सर्जेराव राऊत, रामराव ढाकणे, विष्णू बांगर, बाळासाहेब कदम, रामप्रसाद आ०हाड, सुनिल शिंदे,शरद वांढेकर ,सुरेश नवले, संजय शेळके ,दत्तात्रय परहर, विष्णू चौधरी, प्रदीप चक्रनारायण, शिवाजी ढाकणे ,शकील बागवान, संदीप भालेराव, संजय सोनवणे, मधुकर डहाळे, लक्ष्मण चेमटे ,पांडुरंग देवकर सुधीर रणदिवे ,जनार्दन काळे, विलास लवांडे, ज्ञानदेव कराड, रविंद्र अनाप, शिवाजी माने, सुधीर बोऱ्हाडे, दत्तात्रय काळे, संदीप कडू , सुनिल कदम, संभाजी तुपेरे , दत्तात्रय बर्गे ,संगीता निमसे, उज्वला घोरपडे ,दिपाली बोलके ,संगीता घोडके, संगीता निगळे, मनिषा क्षेत्रे , संगीता बळीद आदींनी केले आहे .
Post a Comment