200 मीटर स्पर्धेत नोहा लीलेसला सुवर्णपदक


माय नगर वेब टीम
दोहा: अमेरिकेच्या नोहा लीलेस याने पुरूषांच्या 200 मीटर्स धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आणि जागतिक मैदानी स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली. त्याच्याच देशाच्या डोनोवान ब्रेझियरने 800 मीटर्स शर्यतीत सोनेरी कामगिरी केली.

लीलेसने 200 मीटर्स शर्यतीत सुरूवातीपासून आघाडी मिळविली होती. शेवटच्या टप्प्यात तो अन्य स्पर्धकांपेक्षा 50 मीटर्सची आघाडी त्याने घेतली व शानदार विजय मिळविला. त्याने हे अंतर 19.83 सेकंदांत पार केले. कॅनडाच्या आंद्रे डीग्रासेसने रौप्यपदक मिळविताना 19.95 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. इक्वेडोरच्या ऍलेक्‍स क्विनोनेझला ब्रॉंझपदक मिळाले. त्याला हे अंतर पार करण्यास 19.98 सेकंद वेळ लागला. त्याने याआधी या स्पर्धेतील 100 मीटर्स शर्यतीतही ब्रॉंझपदक मिळविले होते.
 मी जरी येथे 200 मीटर्सची शर्यत जिंकली असली तरी लोकांनी माझी उसेन बोल्टशी तुलना करू नये. मी गेल्याच वर्षी 200 मीटर्सचा सराव सुरू केला आहे आणि माझी ही पहिलीच जागतिक स्पर्धा आहे. अमेरिकेचा 22 वर्षीय खेळाडू ब्रेझियरने 800 मीटर्सचे अंतर एक मिनिट 42.34 सेकंदात पार करताना स्पर्धा विक्रमही नोंदविला. बोस्नियाच्या अमेल ट्युकाने रौप्यपदकाची कमाई केली. त्याने ही शर्यत एक मिनिट 43.47 सेकंदात पार केली. केनियाच्या फर्ग्युसन रोटिचने ब्रॉंझपदक मिळविले. त्याला ही शर्यत पार करण्यास एक मिनिट 43.82 सेकंद वेळ लागला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post