युतीच्या इतिहासात शिवसेना पहिल्यांदाच होणार लहान भाऊ, लवकरच शिक्कामोर्तब?





माय नगर वेब टीम
मुंबई - राज्यात शिवसेना भाजप या दोन वर्षांची गेल्या अनेक वर्षांपासून युती आहे. मागील विधानसभा निवडणुकीत या युतीला धक्का बसला होता. मात्र निवडणूक निकालानंतरच्या स्थितीनं या पक्षांना पुन्हा एकत्र आणलं. त्यानंतर यंदाची लोकसभा निवडणूक भाजप-शिवसेनेनं एकत्र लढवली. आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही हे दोन्ही पक्ष एकत्रितरित्या काँग्रेस-राष्ट्रवादीला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. पण यावेळी युती होताना शिवसेनेला छोट्या भावाची भूमिका स्वीकारावी लागणार असल्याची चिन्ह आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजपला देशासह राज्यात मोठं यश मिळाले. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भाजप नेतृत्वाने महाराष्ट्रात युती करताना तडजोड न करण्याची भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे शिवसेनेला लहान भावाची भूमिका स्वीकारावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत युतीमध्ये भाजपला 154 ते 159 जागा मिळतील तर दोन्ही पक्ष महायुतीतील मित्रपक्षांना प्रत्येकी 9 जागा सोडतील, असा फॉर्म्युला तयार करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेला 120 जागाच मिळणार आहेत. मात्र हा फॉर्म्युला शिवसेना नेतृत्वाकडून मान्य केला जाणार असल्याची माहिती आहे. याबाबत एका दैनिकाने  वृत्त दिले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post