माय नगर वेब टीम
अहमदनगर- आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना- भाजपाचीच सत्ता येणार असून अहमदनगरचा पुढचा पालकमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचा विश्वास शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी व्यक्त केला. या भागातील साकळाई उपसा जलसिंचन योजना खासदार सुजय विखे पाटील मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर तालुक्यातील रुईछत्तीशी ( ता. नगर ) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत ८७ लाख रूपये खर्चाची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. त्या योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार दादा पाटील शेळके होते. शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, घनश्याम शेलार, बाळासाहेब हराळ, अनिल कराळे, गोविंद मोकाटे, संदेश कार्ले, पंचायत समिती उपसभापती प्रवीण कोकाटे, संदीप गुंड, रवींद्र भापकर, सरपंच मीनाक्षी जगदाळे, दिपाली गोरे, शिवसेना तालुका प्रमुख राजू भगत, प्रकाश कुलट उपस्थित होते.
राठोड म्हणाले, गावातील प्रश्न सोडविन्यात राजकारण आले नाही पाहिजे. ग्रामीण भागातील नागरिकांनी प्रश्न सोडवण्यासाठी एकाच पक्षाच्या मागे उभे राहिले पाहिजे. आपण जो पर्यंत एक होत नाही तो पर्यंत आपले प्रश्न मार्गी लागणार नाही. रुईछत्तीशी आणि वाडी वस्तीवर भीषण पाणीटंचाई आहे, टँकरने पाणीपुरवठा वेळेवर होत नाही. लोकसंख्येच्या दृष्टीने गाव मोठे असल्याने पाण्यासाठी वारंवार जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून अखेर नगर तालुका शिवसेनेच्या प्रयत्नातून पाणी पुरवठा राज्य मंत्री विजय शिवतारे, प्रा.शशिकांत गाडे यांच्या माध्यमातून ही योजना मार्गी लावण्यात आली आहे. अगोदर बुऱ्हाणनगर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना गावापुरतीच मर्यादित होती. परंतु या नवीन योजनेत गावातील सर्व वाड्या वस्त्या समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाड्या वस्त्यांचा पाणी प्रश्न मिटणार आहे.
यावेळी गाडे म्हणाले या योजनेमुळे सर्व वाडी वस्तीवर पाणीपुरवठा प्रश्न मार्गी लागणार आहे. विधानसभेनंतर या भागातील नागरिकांना हक्कांच्या साककाई पाणी योजनेसाठी लढा सुरू ठेवणार आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण गोरे यांनी केले.
Post a Comment