गेल्या पाच वर्षातल्या कामाची पावती म्हणजे ‘महाजनादेश यात्रा’ -चंद्रकात पाटील
माय नगर वेब टीम
नाशिक - महाजनादेश यात्रेला नाशिककरांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याने इचलकरंजीचा विक्रम मोडला असून गेल्या पाच वर्षातल्या कामाची पावती असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
ते नाशिक येथील महाजनादेश यात्रेच्या समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी ते म्हणाले कि, महाजनादेश यात्रेला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून नाशिकमध्ये सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. तसेच देश पुन्हा एकदा विश्वगुरु मोदींच्या काळात झाला आहे. देशाला नवे नेतृत्व मिळाले आहे. तसेच राज्याला हजार कोटी चे पॅकेज दिले, ओबीसीसाठी म्हाज्योती निर्माण केली
आशा वर्कर्सला दोन हजार रुपये मानधन दिले.
ते मुख्यमंत्र्यांचे कौतुक करतांना म्हणाले कि पाच वर्षे सुट्टी न घेता मुख्यमंत्री काम करत राहिले. मराठा समाजाला आरक्षण दिले तसेच धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी गती दिली. यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे नाशिकरांचे आभार व्यक्त करत ते थांबले.
Post a Comment