५० टक्के फॉर्म्युलानुसारच युती होईल - संजय राऊत
माय नगर वेब टीम
मुंबई - शिवसेना - भाजप यांच्यातली युती तुटण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला ५० टक्के फॉर्म्युला ठरल्याची आठवण करून दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्ष या फॉर्म्युलावर सहमती झाल्याची आठवण करून दिली. ५० टक्के फॉ़र्म्युलानुसारच युती होईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, युती होणारच, असा विश्वास भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. महाजनादेश यात्रेला प्रचंड यश मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच पंतप्रधान आज येत असल्याने आणखी जास्त यश मिळेल, अशी प्रतिक्रिया दानवेंनी दिली आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. तर दुसरीकडे युतीची बोलणी उद्यापासून सुरु होतील, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. दरम्यान, उद्या शेवटची भाजपची मेगाभरती असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यानंतर युतीची बोलणी पुढे होतील, अशी शक्यता आहे
Post a Comment