केडगावतील दोन मंदिरात चोरट्याची हातसफाई ; चोरी सीसीटीव्हीत बंद






माय नगर वेब टीम

अहमदनगर - शहरात चोऱ्या व घरफोडीच्या घटना मध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. केडगावत एकच रात्री दोन मंदिरात चोरट्यांनी हातसफाई करत दानपेटीवर डल्ला मारला.
 ओम कॉलनीतील बालाजी मंदिर व बँक कॉलनीतील साई मंदिरात बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. दरम्यान चोरट्यांनी दोन्ही मंदिरात असणाऱ्या दानपेटीतील रोकड लंपास केली. मात्र हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत बंद झाला असून पोलिनसाना चोरट्याचा माग काढणे सोपे  जाणार आहे.
सकाळी मंदिरात आरती करण्यासाठी काही स्थानिक नागरिक मंदिरात आले होते. तेव्हा चोरीचा प्रकार लक्षात आला. स्थानिक नागरिकानी या चोरीची माहिती तातडीने पोलिसांना दिली

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post