ट्रक -कारच्या भीषण अपघातात नगरचे चौघे जागीच ठार


 माय नगर वेब टीम
अहमदनगर - नगर-दौड महामार्गावर बाबुर्डी बेंद परिसरात रात्री अडीचच्या सुमारास ट्रक आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात भिंगारचे तीन व वाळकीचा एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.

अनिरुद्ध भुजबळ (रा. एमए कॉलनी, वडारवाडी), शुभम खेडकर (रा.वाळकी) असिफ पठाण (रा. नागरदेवळे) व गोपीनाथ कुऱ्हाडे (रा. वडारवाडी) असे मृत झालेल्या चौघांची नावे आहेत

नगर दौड महामार्गावरील बाबुर्डी बेंद परिसरातील महादेव वस्ती जवळ ट्रक व कारचा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की कार चक्काचुर झाली होती. कार श्रीगोंदयाहून नगरकडे येत असताना ट्रक खाली घुसन हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी धाव घेतली. कार्ले यांच्यासह सरपंच दीपक साळवे, शरद चोभे, मिनीनाथ चोभे, राघू चोभे, मणेश भोसले यांनी अपघातग्रस्तांना सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात मदत केली. अपघातात भिंगारचे महेश झोडगे यांचा भाचा, इतर दोन व वाळकीचा एक जण होता. अपघाताने भिंगारवर शोककळा पसरली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post