भाजपाच्या मुलाखतीत राडा ; १२५ जण उमेदवारीचे दावेदार


माय नगर वेब टीम

अहमदनगर – विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने इच्छुकांच्या प्रतिथयश हॉटेलमध्ये मुलाखती घेत निवडणुकीची सुरूवातच पंचतारांकीत केली आहे. नगर जिल्ह्याच्या 12 विधानसभा मतदारसंघातून सुमारे 125 जण इच्छुकांनी मुलाखती दिल्या. बुधवारी झालेल्या या मुलाखतीमध्ये सर्वाधिक इच्छुकांची संख्या संगमनेर मतदारसंघात असून, त्या खालोखाल श्रीरामपूरचा नंबर आहे. कर्जत-जामखेड आणि शिर्डी मतदारसंघात एकमेव विद्यमान मंत्र्यांची नावे आहेत. नगरच्या मुलाखती दरम्यान आजी माजी नगरसेवकांचे पुत्र एकमेकांना भिडल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, असं काही घडलेच नाही, किरकोळ विषय होता, असे म्हणत यावर पडदा घातला जात आहे.


राज्यभरात मेगा भरती करत असलेल्या भाजपकडे नगर जिल्ह्यात मात्र कोपरगाव मतदारसंघातून राजेश परजणे आणि श्रीरामपूर मतदारसंघातून ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांचे नाव वगळले तर एकही नवीन प्रभावी चेहरा नसल्याचे समोर आले आहे. काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघातून भाजपतर्फे लढण्यासाठी सर्वाधिक इच्छुकांची गर्दी आहे. त्या पाठोपाठ श्रीरामपूरमध्ये गर्दी आहे.

मंत्री असलेल्या कर्जत-जामखेड आणि शिर्डी या दोन मतदारसंघात इतर कोणताही उमेदवार इच्छुक नसल्याचे समोर आले आहे. शिर्डी मतदारसंघातून इतर दोन नावे यादीत होती, मात्र ते मुलाखतीला आले नसल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे पक्षातून काढलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (श्रीरामपूूर) आणि नगराध्यक्ष विजय वहाडणे (कोपरगाव) यांनीही पक्षाकडे मुलाखती दिल्या आहेत. या दोघांचे निलंबन मागे घेण्यात आल्याचे मुलाखतीनंतर जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी सांगितले. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर यांनी या मुलाखती घेतल्या. प्रत्येकाला स्वतंत्र बोलावून घेण्यात येत होते. मुलाखतीवेळी जिल्ह्यातील इतर कोणताही नेता उपस्थित राहणार नाही, याची काळजी घेण्यात आली होती.


मुलाखत देणारे मतदारसंघनिहाय इच्छुक

संगमनेर : सुभाष गिते, रामचंद्र शेजुळ, हरीभाऊ चेकुर, राजेश महादेव चौधरी, महेश शरद जगताप, भाऊसाहेब आण्णा थोरात, तानाजी बागुल, बाळासाहेब शेंडगे, बाबासाहेब बाबाजी सागर, भानुदाजी डेरे, अशोक इथापे, सुधाकर गुंजाळ, भरत फटांगरे, पुजा दिक्षीत, वैभव लांडगे, अशोक कानवडे, साईनाथ गोडगे, विठ्ठल शिंदे, विक्रमसिंह खताळ, एकनाथ नागरे, सदाशिव थोरात.

कोपरगाव : आ. स्नेहलता कोल्हे, नगराध्यक्ष विजयराव वहाडणेे, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, प्रभाकर तुकाराम वाणी, प्रा. सुभाष शिंदे, सोमनाथ चांदगुडे, सुभाष सुखदेव दवंगे, नामदेव जाधव, विनायक गायकवाड, राजेंद्र खिलारी..

शिर्डी : गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नकुल विलासराव कडू, ऋषिकेश वसंतराव खर्डे.

श्रीरामपूर ; नितीन नवनाथ उदमले, अशोक आबाजी वाकचौरे, अशोक नाथा कानडे, भाऊसाहेब राजाराम वाकचौरे, सतीश कुंडलिक सौदागर, चंद्रकांत भानुदास काळोखे, डॉ. वसंतराव जमदडे, श्रीकांत दशरथ साठे, सागर रंधवे, संतोष रंधवे, नितीन दिनकर, प्रकाश संसारे, अशोक निवत्ती बागुल, बाळासाहेब तोरणे, भिमराज धनाजी बागुल, जिजाबा गंगाराम चिंधे, मिलिंदकुमार साळवे, कल्याणी कानडे, चंद्रकांत कांबळे, सुरेश जगधने, अशोक गायकवाड


नेवासा : आ. बाळासाहेब मुरकुटे, दिनकरराव गर्जे, राजेंद्र एकनाथ निंबाळकर, अ‍ॅड. संजीव तुकाराम शिंदे, अशोक दिनकर ताके, अभिजित अशोक लुणिया, सचिन देसर्डा, अनिल दिनकर ताके, अ‍ॅड. रावसाहेब एकनाथ फुलारी

शेवगाव-पाथर्डी : आ. मोनिका राजळे, बाबासाहेब ढाकणे, अमोल गर्जे, सुनील पाखरे, बाळासाहेब सोनवणे, राहुल कारखिले, दिलीप लांडे, अर्जुन शिरसाठ, नितीन काकडे,अशोक चोरमुले, हर्षदा काकडे, डॉ. अजित फुंदे.

श्रीगोंदा : बबनराव पाचपुते, संतोष बगड, राजेंद्र म्हस्के, दिलीप भालसिंग, दत्तात्रय हिरणवाळे, सुवर्णा पाचपुते, देवराम भगवान वाकडे, अरुण जगताप.

राहुरी : आ. शिवाजी कर्डीले, देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित चंद्रशेखर कदम, विक्रम नारायण तांबे, यमनाजी विठोबा आघाव, साहेबराव पाटीलबा म्हसे, राजकुमार आघाव.

पारनेर : सुभाष चांगदेव दुधाडे, बाळासाहेब पोटघन, अश्विनी दत्तात्रय थोरात, डॉ. अजित लंके, वसंतराव चेडे, बाळासाहेब नरसाळे, दगडू रामजी शेंडगे, पोपटराव मोरे, राजकुमार आघाव, बबनराव रंगनाथ डावखर, पोपटराव नामदेव शेटे, अभिजित रोहवले, निर्मला सुनील थोरात, किसन मारूती पठारे, डॉ. सुनील गंधे.

अकोले : आ. वैभव पिचड, अशोक भांगरे, सुनीता भांगरे

कर्जत-जामखेड : पालकमंत्री राम शिंदे.

नगर शहर : अ‍ॅड. अभय आगरकर, महापौर बाबासाहेब वाकळे, सुवेंद्र गांधी, नगरसेवक महेंद्र तथा भैय्या गंधे, सचिन पारखी, गौतम दीक्षित, देशपांडे.




जागा सेनेच्या, इच्छुक अधिक भाजपाकडून
आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. जुन्या फॉम्युल्यानुसार संगमनेर आणि श्रीरामपूरची जागा शिवसेनेच्या वाट्याला आलेली आहे. पण आश्‍चर्य म्हणजे या दोन्ही मतदारसंघातून सर्वाधिक इच्छुक हे भाजपाकडून आहेत. त्यामुळे वेगवेगळे अर्थ लावण्यात कार्यकर्ते व्यग्र आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post