जिल्हा शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाकडे मंत्री महोदयांसह जि.प सदस्यांची पाठ


माय नगर वेब टीम
अहमदनगर - दरवर्षी प्रमाणे शिक्षक दिनी गुरुवारी ५ सप्टेंबर रोजी आयोजीत जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाकडे पालकमंत्री प्रा.राम शिंदे व गृहनिर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व झेडपी शिक्षण समितीसह बहुतांश जिल्हा परिषद सदस्यांनी पाठ फिरविल्याने कार्यक्रमस्थळी उलट सुलट चर्चेला उधाण आले. पदाधिकारी वगळता बोटावर मोजण्या इतकेच सदस्य उपस्थित होते. 


गुरुवार 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता नगर-औरंगाबाद महामार्गावरील एन.आर लॉन्समध्ये मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कर्तृत्ववान शिक्षकांच्या पाठीवर कोतुकाची थाप व पुढील कार्यासाठी प्रेरणा म्हणून दरवर्षी 14 शिक्षकाची निवड करून शिक्षक दिनी मंत्री महोदय व झेडपी पदाधिकारी-अधिकारी यांच्याहस्ते गौरव करण्यात येतो. मात्र, मोठा गाजा-वाजाता करून निमंत्रण पत्रिकेवर सर्वांचा नामोल्लेख करूनही त्या लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.. याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार विजय औटी, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, उपाध्यक्ष राजश्रीताई घुले पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर,अर्थ व बांधकाम समिती सभापती कैलास वाकचौरे, समाज कल्याण सभापती उमेश परहर, कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे,पारनेर पं.स सभापती राहुल झावरे, नगरचे सभापती रामदास भोर,जि. प सदस्य अनिल कराळे, दिनेश बर्डे,काशिनाथ दाते,सुप्रिया झावरे,महेश सूर्यवंशी, प्राथमिक विभागाचे गट शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे व माध्यमिक शिक्षणाधिकारी दिलीप थोरे आदी उपस्थित होते.तालुका निहाय पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे - (कंसात शाळा) अशी-- अकोले- रामनाथ हौशीराम वाकचौरे (विरगाव), संगमनेर - ज्ञानेश्‍वर पंढरीनाथ फटांगरे (सारोळा पठार), कोपरगाव- ज्ञानेश्वर पांडुरंग सौदाणे (शहापूर), राहता- शिवाजी तानाजी गायकवाड (नांदुर्खी) श्रीरामपूर- राजेंद्र अण्णासाहेब पंडित (दत्तनगर) राहुरी- विजय सुधाकर कदम (कोंढवड) नेवासा- मनीषा एकनाथ लबडे (दत्तवाडी), शेवगाव - रोहिणी प्रभाकर साबळे (भायगाव) पाथर्डी- शैलेश संपतराव ढमाळ (मढी) जामखेड - काकासाहेब अर्जुन कुमटकर (बऱ्हाणपूर) कर्जत- छाया भानुदास मुने (मिरजगाव) श्रीगोंदा- ताराबाई तुकाराम पवार (शेंडगेवाडी) पारनेर-- बाळू रेवजी शिंगोटे (रोकडेवस्ती) वस्ती व नगर- वैजनाथ विलास धामणे (राळेगण) या शिक्षकांचा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post