यंदा 'या' १४ शिक्षकरत्नांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार



उद्या शिक्षक दिनी होणार वितरण

गणेश हापसे @ माय नगर

अहमदनगर - दरवर्षी शिक्षक दिनी ५ सप्टेंबर रोजी देण्यात येणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी तालुका निहाय एक याप्रमाणे १४ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर बुधवारी सायंकाळी सदर अंतिम यादीस विभागीय आयुक्त राजाराम माने यांची अंतिम मान्यता मिळाली. उद्या गुरुवारी 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता नगर-औरंगाबाद महामार्गावरील एन.आर लॉन्समध्ये मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

तालुका निहाय पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे - (कंसात शाळा) अशी-- अकोले- रामनाथ हौशीराम वाकचौरे (विरगाव), संगमनेर - ज्ञानेश्‍वर पंढरीनाथ फटांगरे (सारोळा पठार), कोपरगाव- ज्ञानेश्वर पांडुरंग सौदाणे (शहापूर), राहता- शिवाजी तानाजी गायकवाड (नांदुर्खी) श्रीरामपूर- राजेंद्र अण्णासाहेब पंडित (दत्तनगर) राहुरी- विजय सुधाकर कदम (कोंढवड) नेवासा- मनीषा एकनाथ लबडे (दत्तवाडी), शेवगाव - रोहिणी प्रभाकर साबळे (भायगाव) पाथर्डी- शैलेश संपतराव ढमाळ (मढी) जामखेड - काकासाहेब अर्जुन कुमटकर (बऱ्हाणपूर) कर्जत- छाया भानुदास मुने (मिरजगाव) श्रीगोंदा- ताराबाई तुकाराम पवार (शेंडगेवाडी) पारनेर-- बाळू रेवजी शिंगोटे (रोकडेवस्ती) वस्ती व नगर- वैजनाथ विलास धामणे (राळेगण) या शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली असल्याची माहिती प्राथमिक विभागाचे गट शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे व माध्यमिक शिक्षणाधिकारी दिलीप थोरे यांनी दिली.पुरस्कार वितरण समारंभ पालकमंत्री प्राध्यापक नामदार राम शिंदे व व गृहनिर्माण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते व व महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार विजय औटी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील उपाध्यक्ष राजश्रीताई घुले पाटील प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.यावेळी अर्थ व बांधकाम समिती सभापती कैलास वाकचौरे, समाज कल्याण सभापती उमेश परहर, कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे, महिला व बालकल्याण सभापती अनुराधाताई नागवडे, शिक्षण समिती सदस्य राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे, सुवर्णाताई जगताप, राहुल झावरे, मिलिंद कानवडे, विमलताई आगवन, उज्वलाताई ठुबे आदी उपस्थित राहणार आहेत...

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post