Chandrayaan 2 | इस्रो प्रमुख के सिवन यांना अश्रू अनावर, पंतप्रधान मोदींनी धीर दिला!




माय नगर वेब टीम
बंगळुरु - 'चांद्रयान 2' मोहीमेत आलेल्या अडचणीमुळे इस्रोचे प्रमुख के सिवन अतिशय भावूक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर के सिवन यांनी मोदींची गळाभेट घेऊन अश्रूंना मोकळी वाट करुन दिली. यावेळी मोदींनीही भारतीय तुमच्या पाठीशी आहेत, असं म्हणत के सिवन यांना धीर दिला.

अवघ्या जगाचं लक्ष लागलेली भारताची महत्वाकांक्षी चंद्रयान मोहीम चंद्राच्या 2.1 किलोमीटर जवळ जाऊन थांबली. चंद्राच्या 2.1 किलोमीटर अंतराजवळ गेल्यावर विक्रम लॅण्डरशी संपर्क तुटला. पण अजूनही संपर्क होण्याची आशा कायम आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांकडून डेटा विश्लेषणाचं काम सुरु आहे.

दरम्यान अद्याप भारताची ही मोहीम अयशस्वी ठरलेली नाही. लॅण्डरशी जरी संपर्क तुटला असला तरी ऑर्बिटरद्वारे मोहीमेचा बराचसा भाग पूर्ण करता येणार आहे. सध्या काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post