Chandrayaan 2 | संपूर्ण देश इस्रोच्या पाठीशी : पंतप्रधान मोदी
माय नगर वेेेब टीम
बंगळुरु - "मी तुमची मनस्थिती जाणतो, पण निराश होऊ नका, देश इस्रोच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे," अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान 2 मोहीमेशी संबंधित प्रत्येकाला धीर दिला. बंगळुरुमधील इस्रोच्या कंट्रोल सेंटरमध्ये पंतप्रधान मोदींना चांद्रयान 2 मोहीमेत आलेल्या अडचणीबद्दल देशाला संबोधित केलं.
अवघ्या जगाचं लक्ष लागलेली भारताची महत्वाकांक्षी चंद्रयान मोहीम चंद्राच्या 2.1 किलोमीटर जवळ जाऊन थांबली. चंद्राच्या 2.1 किलोमीटर अंतराजवळ गेल्यावर विक्रम लॅण्डरशी संपर्क तुटला. पण अजूनही संपर्क होण्याची आशा कायम आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांकडून डेटा विश्लेषणाचं काम सुरु आहे.
Post a Comment