माय नगर वेब टीम
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात युतीचंच सरकार येणार असं विधान करताना उद्धव ठाकरेंनी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब केलं आहे. विशेष म्हणजे उद्धव यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. यामुळे युतीचा घोळ आता मिटला असून लवकरच जागा वाटप जाहीर होईल असे सांगितले जात आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते मुंबईतील तीन नवीन मेट्रोमार्गाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना उद्धव म्हणाले की, “मोदीजी मी किती गोष्टींसाठी तुमचं अभिनंदन करु. गेली अनेक वर्ष ज्या गोष्टी आपण बोलत होतो त्या गोष्टी करुन दाखवल्या आहेत,” काळ ३७० चा उल्लेख करत उद्धव म्हणाले की “काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक होता, आहे आणि राहणार असल्याचे नरेंद्र मोदींनी सिद्ध करुन दाखवलं,” असे सांगत “मोदीजी मला तुमचा अभिमान असल्याचं” त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आत्तापर्यंत भाजप सेनेच्यात युतीबाबत विविध तर्क वितर्क लावले जात होते. परंतु आता उद्धव ठाकरेंनीच मोदींसमोर युतीबद्दल जाहीर विधान केल्याने युतीवर शिक्का मोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.
कलम 370 रद्द केल्याबद्दल मोदींचं कौतुक करताना उद्धव ठाकरेंनी राम मंदिर आणि समान नागरी कायदा मंजूर करण्याची आठवणही करून दिली.
गणेशोत्सवाच्या वेळी जलप्रदूषण न करण्याचा संकल्प करा-पंतप्रधान मोदींचे आवाहन
गणेश विसर्जनाच्या वेळी जलप्रदूषण करू नका. आपल्याला संकल्प करायचा आहे की विसर्जनानंतर समुद्रातील घाण साफ करू. समुद्र आणि मिठी नदी प्लास्टिकमुक्त करू. प्रदूषण वाढवणारा गणेशउत्सव आपल्याला करायचा नाही, विसर्जनाच्या वेळी जलप्रदूषण करू नका, प्लास्टिकमुक्त विसर्जन करा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यावेळी त्यांनी एक भारतीय- एक संकल्प करण्याचे देखील आवाहन केले.
यावेळी ते म्हणाले की, मी रशियात होतो तरी मुंबईचा पाऊस आणि पाण्याच्या स्थितीबाबत अपडेट घेत होतो. यावेळी इसरोच्या वैज्ञानिकांचं कौतुक करताना ते म्हणाले की, आव्हानांचा सामना करत पुढे जाणारे लोकच मोठे होतात. मिशन चांद्रयानमध्ये एक अडथळा आला आहे. मात्र आपले बहादूर वैमानिक हटणार नाहीत, चंद्रावर पोहोचायचं स्वप्न पूर्ण होणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आगामी काळात आधुनिक पायाभूत सुविधांवर 100 लाख कोटी रुपये खर्च करणार आहोत. देशभरात मोबिलिटी, ट्रान्सपोर्टला मजबूत करण्यावर जोर दिला जात आहे. आज ज्या वेगाने काम होत आहे तसे आधी कधीच झाले नाही, असेही मोदी म्हणाले.
Post a Comment