राहुरीच्या मैदानात 'स्वाभिमानी'चा भिडू


माय नगर वेब टीम

अहमदनगर- राहुरी तालुक्यातील प्रस्थापित राजकारणी व विरोधकांकडून शेतकऱ्यांसह ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचा हिरमोड झाला आहे. सक्षम पर्याय म्हणून जनता व कार्यकर्ते यांच्या आग्रहाखातर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे..याबाबत खासदार राजू शेट्टी यांनी सहमती दर्शवली असून निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केले आहे. राहुरी विधानसभा मतदार संघाच्या जागेवर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा अधिकार असून आम्ही विधानसभा निवडणुक लढविणार आणि तालूक्याचा विकास करणार असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी बुधवारी दुपारी राहुरीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

स्वातंत्र्या नंतरच्या ५० वर्षात देखील राहुरी तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असून ते सोडविण्यासाठी आता राहुरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीत स्वाभीमानी शेतकरी संघटना उमेदवार उभा करणार आहे. मोरे यांच्या उमेदवारीमुळे राहुरी तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार असून निवडणूक रंगतदार ठरणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी मोरे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवीला असून त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून दुध उत्पादक शेतकर्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि शेतकर्यांना आपल्या न्याय हक्काची जाणीव करून देणारे, प्रसंगी शेतकर्यांसाठी शासकीय यंत्रणेबरोबर संघर्ष करताना तुरूंगवास भोगणारे रविंद्र मोरे हे तरूण नेतृत्व शेतकर्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. राहुरी तालुक्यातील अनेक आघाड्यांवरील सर्व सामान्यां पासून शेतकर्यां पर्यंतच्या प्रश्नांची जाण मोरे यांना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोकशाही मार्गाने चळवळी, आंदोलनाच्या माध्यमातून संघर्ष करताना त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. शेतीच्या पाट पाण्याचा प्रश्न, ग्रामीण भागातील रस्ते, ऊसाच्या एफ आर पीचा प्रश्न अशा अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे.

यंदाच्या राहुरी विधानसभा मतदार संघातील प्रश्नांना वाचा फोडताना शेतकरी आणि सर्व सामान्य नागरीकांच्या समस्या घेऊन ते निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आजही राहुरी तालुक्याच्या ग्रामीण भागात व्यवस्थित रस्ते नाहीत. मुळा धरण असूनही पिण्याचे पाणी आणि पाट पाण्यासाठी शेतकर्यांना रस्त्यावर यावे लागते. हे मोठे दुर्दैव असून निष्क्रिय नेतृत्वामुळे तालूक्याच्या वैभवाला काळीमा लागली असून विकास रखडला आहे. या सर्व समस्या सोडवण्यासाठी रविंद्र मोरे यांनीच निवडणूक लढवावी असा आग्रह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकर्यांनी आग्रहाची भूमिका घेतली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post