'घोसपुरी'त ठणठणाट ; 30 गावे एन पावसाळ्यात उपाशी


माय नगर वेब टीम

अहमदनगर : नगर तालुुक्यातील १७ गावांना ऐन दुष्काळात वरदान ठरलेली घोसपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना विसापूर धरणातील पाणी संपल्यामुळे गेल्या चार पाच दिवसापासून बंद आहे, कुकडी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष विसापूर धरण क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्याच्या मोटारी सुद्धा बंद पावसाळ्यात हि अवस्था पुढील काळात काय होणार याची नाश्चित्तच चिंता वाढली आहे. घोसपुरी योजनेतून १५ गावांना पाणीपुरवठा होतो तसेच तालुक्यातील इतर गावांचे पाण्याचे टँकरही भरले जातात. सर्व टँकर बंद करण्यात आले आहेत त्यामुळे लोकांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे, तालुक्यात प्यायला पाणी नाही , जनावरांनाही प्यायला पाणी नाही, एकंदरीत पाण्यााची गंभीर परिस्थिती ग्रामीण भागातील लोकांची आहे. नगर तालुक्याला कुणीही वाली राहिला नसल्याची लोकभावना तयार होत आहे त्यातच नगर तालुक्यात मागील एका महिन्यात सहा शेतकरी आत्महत्या झाल्या.


पावसाळ्यातही विकतच्या पाण्यावर भागवितात तहान
 दुष्काळात घोसपुरी योजना सुरू असताना काही गावांत पुरेसा पाणीपुरवठा होत नव्हता. वाळकी, वडगाव तांदळी आदीसह काही गावात पंधरा दिवसातून एकदा पाणी मिळत होते. अल्प पाणीपुरवठा होत असल्याने या गावातील जनतेला विकतचे पाणी घ्यावे लागत होते. मात्र पावसाळ्यातच पाण्याअभावी घोसपुरी योजना बंद पडली. त्यात पावसाअभावी येथील तलाव कोरडे पडल्याने स्थानिक पाणी योजनाही बंद आहेत. त्यामुळे पावसाळ्यातही पिण्यासाठी विकतचे पाणी घेण्याची वेळ येथील नागरिकांवर ओढावली आहे.


विसापुर तलावातील पाण्याचे योग्य नियोजन करावे - संदेश कार्ले
घोसपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना समितीचे अध्यक्ष संदेश कार्ले व योजनेत समाविष्ट गावातील सरपंचानी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यात विसापुर तलावातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या योजनेतुन पिण्याचे टॅंकर भरले जातात योजना बंद झाल्याने हे टँकर आता बंद झाले. तालुक्यात पाऊस नसल्याने भिषण पाणी टंचाई आहे यामुळे टॅंकर व योजना सुरू राहणे आवश्यक आहे. विसापुर पाण्याचे बाष्पीभवन , गळती या गोष्टी विचारात घेऊन पाणीसाठा दुप्पट करून तो राखीव करण्याची मागणी कार्ले यांनी केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post