'कार्यकर्त्यांनो विधानसभेवर भगवा फडविण्यासाठी सज्ज व्हा'



माय नगर वेब टीम
अहमदनगर - शिवसेना पक्षाने नेहमीच सर्वसमाान्यांच्या अन्यायाला वाचा फोडली आहे. त्यामुळेच सत्तेत जरी शिवसेना सहभागी असली तरी ज्या गोष्टी सेनेला पटल्या नाहीत, त्यांनी त्या गोष्टींना विरोध केला. शेतकरी, युवक, महिला यांच्यासाठी शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न केला. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा मुद्दा शिवसेनेने उचलून धरुन लाखो शेतकर्‍यांना विम्याचा लाभ मिळवून दिला आहे. शिवसेनेची बांधिलकी जनतेशी सत्तेशी नाही, तेव्हा जेथे चुकेल, तेथे शिवसेना विरोध करेल. याच जोषात शिवसैनिक काम करत आहे. आताही विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज व्हावे व विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी प्रयत्न करावेत. उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली नगरमध्ये शिवसेनेचे काम चांगले असून, शिवसैनिकांनी आता त्यांना विधानसभेत पाठवावे, असे प्रतिपादन शिव व्याख्याते उपनेते प्रा.नितीन बानगुडे यांनी केले.
शिवव्याख्याते शिवसेना उपनेते प्रा.नितीन बानगुडे नगरमध्ये आले असता, त्यांचा नंदनवन उद्योग समुहाच्यावतीने सत्कार करतांना संजय जाधव व दत्ता जाधव. समवेत शिवसेना उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक योगिराज गाडे, भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड, अनिल कराळे, शरद कोके आदि उपस्थित होते.
यावेळी नंदनवन उद्योग समुहाचे संजय जाधव यांनी नंदनवन परिवाराच्यावतीने राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती प्रा.बानगुडे यांना दिली.  यावेळी प्रा.बानगुडे यांनी कौतुक करुन असेच कार्य यापुढेही सुरु ठेवावा, असे सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post