माय नगर वेब टीम
अहमदनगर - दीनदुबळ्या, कामगारवर्ग व आर्थिक दुर्बल घटकांसाठी आधार ठरलेल्या फिनिक्स सोशल फाऊंडेशनने नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना नवदृष्टी देत सुंदर सृष्टीसह माणुसकीचे दर्शन घडविले. नुकतेच मोहरम व गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर झालेल्या नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरामधील 98 लाभार्थी यशस्वी शस्त्रक्रिया करुन नगरला परतले. त्यांच्या चेहर्यावरील आनंदभाव व हास्य एक वेगळा समाधान देणारे होते.
उमरगा (उस्मानाबाद) येथील आजीबाई शस्त्रक्रिया करुन परतताच स्वागतासाठी आलेले फिनिक्सचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांना कवटाळून घेतले. मुला तुझ्या पुण्याईने मला हे जग पाहता आले रे. नाहीतर अंधुक नजरेनेच जीवनाचा शेवट झाला असता, असे सांगताच उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणवळ्या. तर दुसरे गृहस्थ एका डोळ्याने कायमचे अंध असलेले व दुसर्या डोळ्याला देखील काचबिंदू असल्याने ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीकरणे जिकरीचे काम होते. एका डोळ्यावर काचबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने स्पष्ट दिसू लागल्याचा आनंद त्यांना गगनात मावेनासा झाला होता. जीवनात नव चैतन्य संचारलेल्या या आजोबांनी धन्यवाद देत ऋण व्यक्त केले.
कोणी कर्जबजारी शेतकरी कुटूंबातील, कोण कामगार व दुर्बलघटकातील गृहस्थांना या शिबीराचा लाभ मिळाला. खर्चिक मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया आर्थिकदृष्ट्या पेळवणारी नसल्याने फिनिक्सने घेतलेले नेत्र शिबीर त्यांच्या अंधकारमय जीवनात नवसंजीवनी देणारे ठरले. पुणे येथील बुधराणी हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया होऊन नगरमध्ये नुकतेच नागरदेवळे येथे शस्त्रक्रिया करुन परतलेल्या या गृहस्थांच्या चेहर्यावरील आनंद व जगण्याची नवी उमीद देणारे होते.
Post a Comment