माय नगर वेब टीम
नवी दिल्ली - चांद्रयान-2 च्या लँडरचा पत्ता लागल्याची माहिती रविवारी इस्रो प्रमुखांनी जाहीर केली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, ऑर्बिटरने लँडर विक्रमचा केवळ पत्ताच लावला नाही, तर थर्मल इमेज सुद्धा घेतल्या आहेत. परंतु, लँडरशी अद्यापही संपर्क झाला नाही. आता इस्रोकडून नव्याने संपर्क साधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. लवकरच पुन्हा संपर्क साधला जाईल अशी उमेद के. सिवन यांनी व्यक्त केली आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, आम्ही चंद्राच्या पृष्ठभागावर बिक्रम लॅंडरचा शोध घेण्यात यशस्वी झालो आहोत. त्याचे बहुदा हार्ड लॅंडिंग झाले असावे. मात्र त्यात त्याचे काय नुकसान झाले याची माहिती आम्हाला नाही. त्याच्याशी संपर्क सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणखी दोन आठवडे ते सुरूच ठेवण्यात येतील.
विक्रमचा संपर्क तुटला त्यावेळी तो चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर होता. त्यावेळी त्याचा वेग प्रतिसेकंद 60 मिटर होता, अशी माहितीही त्यांनी दिली.
Post a Comment