
माय नगर वेेेब टीम
मुंबई - विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळावे, यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारला असून लवकरच नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा करण्यात येणार आहे. पण त्याचवेळी पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी तीन कार्याध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे समजते.
माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार अमित देशमुख यांच्यासह माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व के.सी.पाडवी या तिघांची कार्याध्यक्षपदी नेमणूक होण्याची शक्यता आहे. लोकसभेतील दारूण पराभवानंतर कार्यकर्त्यांच्या मनोबलावर झालेला परिणाम आणि विधानसभेच्या दृष्टीने पक्षासमोरील आव्हान, यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेसकडून कार्याध्यक्षांची नेमणूक केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Post a Comment