
माय नगर वेब टीम
पुणे - लोकसभा निवडणुकीत आघाडीसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभेला 49 जागा लढवणार असल्याचे संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. 49 जागांवर विधानसभा लढवण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तयारी असून भाजप-शिवसेना सोडून सर्व पर्याय आमच्यासाठी खुले असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची दोन दिवसीय कार्यकारणीची बैठक घेण्यात आली. त्यात 49 जागा लढवण्याबाबत ठराव एकमतांने मंजूर करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन जागा सोडल्या होत्या.
49 जागांवर विधानसभा लढवण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तयारी आहे. मात्र मी विधानसभा लढवणार नाही, असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. या सरकारने शेतकर्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. दुष्काळ हा निकष धरून शेतकर्यांना पीक विम्याची रक्कम द्यावी, असे राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
Post a Comment