
माय नगर वेब टीम
अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावल्यानंतर आता त्यांचे दुसरे नातू पार्थ पवारांच्या निवडणूक लढण्याबाबत चर्चा सुरु आहेत. रोहित पवार विधानसभेच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहे. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी त्यांनी पक्षाकडे अर्जदेखील केला आहे. निवडणूक लढवण्यासाठी याच मतदारसंघाची निवड का केली ? याबाबत रोहित पवारांनी खुलासा केला आहे.
रोहित पवारांनी याबाबत माहिती देण्यासाठी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये रोहित यांनी म्हटलं आहे की, या मतदारसंघात काम करण्याची प्रचंड मोठ्ठी संधी आहे. कोणत्या मतदारसंघातून लढणं सोप्प आहे हा विचार न करता कोणत्या मतदारसंघात काम करण्याची संधी आहे हा विचार मी केला. कर्जत जामखेड मधील तरुणांशी, महिलांशी, विद्यार्थ्यांशी, शेतकऱ्यांशी, कष्टकऱ्यांशी, व्यापाऱ्यांशी समाजातील प्रत्येक व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. साखर कारखान्याच्या निमित्ताने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसोबत असणारा हा संपर्क सामाजिक कामांमुळे अजून दृढ होत गेला. पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी माझ्या उमेदवारीची मागणी केलीच, परंतु जेव्हा कर्जत जामखेड मधील सर्वसामान्य नागरिकांनी माझ्या उमेदवारीची मागणी केली, तेव्हा लोकांनी टाकलेल्या विश्वासाचा मनापासून आनंद, अभिमान वाटला. लोकांच्या मागणीनंतरच पक्षाकडे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Post a Comment