माय नगर वेब टीम
मुंबई - राज्य शासनाच्या मेगा भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मराठा आरक्षणाच्या सुधारणा विधेयकावर राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर राजपत्र जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाच्या विविध विभागांमध्ये रिक्त असलेल्या पदांवर भरतीला लवकरच सुरुवात होणार आहे.
मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 13 टक्के आरक्षणाचा कायदा 1 जुलैपासून लागू होणार आहे. आठवड्याभरात पहिल्या टप्प्य़ाच्या नोकरभरतीलाही सुरुवात होणार आहे. आतापर्यंत साधारण 20 हजार जागांसाठी जाहिराती निघाल्या आहेत. तर उर्वरित विभागांमधील रिक्त पदांसाठी लवकरच जाहिराती निघणार आहेत.
कुठल्या विभागात सुरु होणार भरती?
ग्रामविकास विभाग - 13,000 पदं
कृषी – 1585 पदं
वन संरक्षक – 1500 पदं
सार्वजनिक बांधकाम विभाग – 435 पद
जलसंधारण – 250 पदं
आरोग्य – 800 पदं
वित्त (ऑडिट) – 959 पदं

Post a Comment