
माय नगर वेब टीम
मुंबई - संघाविरोधात ट्विट केल्यानंतर संघाने राहुल गांधींविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. याप्रकरणी राहुल गांधी मुंबईतल्या शिवडी कोर्टात हजर झाले. त्यावेळी राहुल गांधी यांनी मी दोषी नाही असे वक्तव्य केले. कोर्टाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राहुल गांधींविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. याप्रकरणी राहुल गांधी यांनी मुंबईतल्या शिवडी कोर्टात हजेरी लावली. राहुल गांधी जेव्हा मुंबईत दाखल झाले तेव्हा विमानतळावरच त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. कृपाशंकर सिंह, मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, संजय निरूपम यांचीही मुंबई विमानतळाबाहेर हजेरी होती. राहुल तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ ह अशा घोषणा मुंबई विमानतळावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या.
Post a Comment