माय नगर वेब टीम
अहमदनगर - श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील अभियंता राहुल नानासाहेब पवार (वय 27 वर्षे) यांनी गुरुवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास घरात बंदुकीने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पब्जी गेमच्या आहारी गेल्याने त्याने आत्महत्या केली असावी, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, यापूर्वी राहुरी तालुक्यात पब्जी गेमने तरूणाने गळफास घेतला होता.
राहुल पवार हे विवाहित आहेत. त्यामुळे नेमकी पब्जी गेममुळेच त्यांनी आत्महत्या केली की दुसरे काही कारण आहे, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. पवार यांनी आज सकाळी अचानक आत्महत्या केल्यामुळे टाकळीभान येथील ग्रामस्थांनी त्यांच्या घरी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पवार हे काही दिवसांपासून पब्जी गेमच्या आहारी गेले होते, असे त्यांचे नातेवाईक सांगतात. श्रीरामपुर बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार यांचा तो मुलगा होता. चार महिन्यापूर्वीच त्याचा विवाह झाला होता.

Post a Comment