शिर्डीत हत्याकांड ; एकाच कुटूंबातील तिघांचे चिरले गळे

माय नगर वेब टीम
शिर्डी –  निमगाव शिवारातील वस्तीवर आज शनिवारी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील तिघाची  घराशेजारी राहणाऱ्याने कोयत्याने गळा चिरून हत्या केेली. या घटनेने  जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे

दगाबाई  ठाकूर, नामदेव ठाकूर,   व खुशी ठाकूर अशी मृतांची नावे आहेत. राजेंद्र ठाकूर व एक सहा वर्षाची मुलीवर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे

निमगाव शिवारात मंगेश कातोरे यांच्या वस्तीवर राहणाऱ्या  दगाबाई ठाकूर, नामदेव ठाकूर व खुशी ठाकूर याची घरा शेजारीच राहणाऱ्या अर्जुन पन्हाळे याने कोयत्याने गळा चिरून हत्या केली.  पहाटे साडेसहा वाजता ही घटना घडली आहे.  या हल्ल्यात राजेंद्र ठाकूर व याच कुटुंबातील आणखी एक मुलगी जखमी झाली असून या कुटुंबातील एक ६ वर्षाची मुलगी बचावली आहे. जखमींवर साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे. पोलिसांनी अर्जुन पन्हाळे याला ताब्यात घेतले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post