आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत उद्धव ठाकरेही पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा करणार ?



माय नगर वेेेब टीम

मुंबई - आषाढी एकादशीला पंढरपुरात मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील विठ्ठल-रुख्मिणीची महापूजा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता दोन्ही नेते विठ्ठलाचं दर्शन घेऊन निवडणुकांना सामोरे जाण्याची शक्यता आहे.

येत्या 12 जुलै रोजी आषाढी एकदशी आहे. मुख्यमंत्री सपत्नीक विठ्ठलाची पूजा करतात, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. मात्र यावर्षी मुख्यमंत्र्यासोबत उद्धव ठाकरे सपत्नीक आषाढी एकादशीला महापूजेला दिसण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत युतीला मिळालेल्या यशानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर्व विजयी खासदारांना घेऊन अयोध्येत गेले होते. तसेच पंढरपुरात देखील जाण्याचं नियोजन होतं. मात्र दिल्लीत अधिवेशन सुरु झाल्यामुळे सर्व खासदारांना घेऊन जाता आले नव्हते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post