वंचित-काँग्रेसच्या चर्चे आधीच भाजपचा मोठा प्लॅन




माय नगर वेब टीम
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप मोठी चाल खेळणार असल्याचं बोलल जात आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना भाजपने राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर पाठविण्याची तयारी केली आहे, असं वृत्त ‘टीव्ही 9 मराठी’ या वृत्तवाहिनेने दिले आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीला आपल्यासोबत घ्या, असा सल्ला दिला आहे. त्याआधीच भाजपचा काँग्रेसला चितपट करण्याचा डाव आहे.

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना तश्या प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. लवकरच ते प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती मिळतीये.

दरम्यान, या सगळ्यावरती प्रकाश आंबेडकर यांची यासंबंधीची कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post