माय नगर वेब टीम
राहुरी -
कृषि दिनानिमित्त महात्मा फुले कृषि विद्यापीठात मा. कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा यांचे अध्यक्षतेखाली दि. ८ जुलै, २०१९ रोजी सकाळी ९.०० वा. डॉ. नानासाहेब पवार सभागृहामध्ये वनमहोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणुन राज्याचे कृषि मंत्री डॉ. अनिल बोंडे उपस्थित असणार आहेत. यावेळी अहमदनगरचे जिल्हाधिकारी श्री. राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विश्वजीत माने, जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. इशु सिंधू, उपवनसंरक्षक श्री. आदर्श रेड्डी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. विलास नलगे, उपविभागीय वन अधिकारी श्रीमती किर्ती जमदाडे हे उपस्थित असणार आहेत. या प्रसंगी संशोधन संचालक तथा संचालक विस्तार शिक्षण डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता (कृषि) डॉ. अशोक फरांदे, कुलसचिव श्री. सोपान कासार, नियंत्रक श्री. विजय कोते, विद्यापीठ अभियंता इंजि. मिलिंद ढोके उपस्थित असणार आहेत.
कृषि दिन आणि वन महोत्सवानिमित्त विद्यापीठातील एक हजारहुन अधिक कर्मचार्यांचे २०-२० चे ग्रृप करुन विद्यापीठ परिसरामध्ये ४६ ठिकाणी ३०००० विविध प्रकारच्या झाडांची लागवड करणार आहे. विद्यापीठ परिसरात सिताफळ, आवळा, कागदीलिंबु, आंबा, जांभूळ, कडुनिंब, बांबू, काशीद, करंज, आवळा, वावळा शोभिवंत आणि औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे.

Post a Comment