नगरसेवक कैलासमामा गिरवले यांच्या मृत्‍यूच्‍या कारणांची दंडाधिकारीय चौकशी


माय नगर वेब टीम

अहमदनगर - एसपी ऑफिस तोडफोड प्रकरणात आरोपी असलेल्या नगरसेवक कैलास रामभाऊ गिरवले यांचा न्यायालयीन कोठडीत असतांना उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नगरसेवक गिरवले यांच्या मृत्‍यूच्‍या कारणांची दंडाधिकारीय चौकशी करण्‍यासाठी उपविभागीय दंडाधिकारी नगर यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

नगरसेवक कैलास रामभाऊ गिरवले यांचा ससून रुग्‍णालय, पुणे येथे उपचार दरम्‍यान मृत्‍यू झाला. गिरवले यांच्या मृत्यूची कारणीभूत असलेल्या लोकांची, पुराव्यांची व संपूर्ण घटनेची माहिती असणाऱ्यांनी दंडाधिकारी यांच्या चौकशीस उपयोगी पडेल अशी माहिती उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍याकडे दि. 6 ऑगस्‍ट रोजी सकाळी 11 वाजता लेखी स्‍वरुपात देण्‍यात यावी. माहिती देणा-याने संपूर्ण नाव, वय व पुर्ण पत्‍ता मोबाईल क्रमांक व स्‍वतःची स्‍वाक्षरी करावी तसेच मृत्‍यू संबंधीच्‍या व दृश्‍याच्‍या बाबीचा सविस्‍तर मजकूर देण्‍यात यावा, असे नगर भागाचे उप विभागीय दंडाधिकारी उज्‍वला गाडेकर यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post