राठोड कडाडले! ; म्हणाले 'त्या' इमारतीला धक्का लागू देणार नाही



माय नगर वेब टीम

अहमदनगर- कोणत्याही परिस्थितीत नगर तालुका खरेदी विक्री संघाची जुनी इमारत पाडू दिली जाणार नाही, सर्वजण एकत्र रहा नगर शिवसेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल असे प्रतिपादन सेनेचे माजी आमदार तथा उपनेते अनिल राठोड यांनी केले

नगर तालुका खरेदी विक्री संघाची जुनी इमारत धोकादायक ठरवून, ती खाली करण्यासाठी संघाने भाडेकरूंना 72 तासात जागा खाली करण्याची नोटीस दिल्यानंतर भाडेकरूंनी या अन्याय्य नोटीसीबद्दल जिल्हाधिकारी, जिल्हापोलिस प्रमुख, जिल्हा उप निबंधक, महानगरपालिका आयुक्त, यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र या ठिकाणी उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. त्या नंतर पत्रकार परिषदेत सर्व भाडेकरूंनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला. त्या नंतर उपनेते अनिल राठोड यांनी मार्केट मध्ये येऊन भाडेकरूंची भेट घेतली, त्यांच्या समस्या समजून घेतल्या व शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल फक्त फोन करा 200 मुले तुमच्या मदतीला 15 मिनिटात धावून येतील.

आज राठोड यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्याचे शिष्टमंडल महानगरपालिका आयुक्त भालसिंग यांना भेटणार आहे. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाण्याची तयारी आहे

या प्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौदर, शहर प्रमुख दिलीप सातपुते, बाजीराव खांदवे, संजय गुंदेचा, महेश गुंदेचा, प्रीतम गुंदेचा, माधव खिलवाणी, लालचंद खिलवानी, किरण गुंड, देवांग कुरवा धनंजय जोशी, प्रकाश पुरुषोत्तम, रमेश गुंदेचा,असिफखान शरीफ खान, धनराज खिलवानी, दीपक खिलवानी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post