
माय नगर वेब टीम
मुंबई - मुंबईत गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. मालाडमध्ये पिंपरीपाडा परिसरात घरांवर भिंड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी आहेत. तर जवळपास ढिगाऱ्याखाली 30 जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफ, अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. मात्र मुसळधार पावसामुळे बचावकार्यात मोठा अडथळा येत असल्याची माहिती मिळत आहे.

Post a Comment