माय नगर वेब टीम
मुंबई - महात्मा गांधींना नोटांवरून काढा, जगभरातून त्यांचे पुतळे हटवा आणि गोडसेला थँक्यू म्हणा, असे ट्विट करून मुंबई महापालिकेच्या उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी खळबळ उडवली होती. यावरून त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला. त्यांच्या या ट्विटची गंभीर दखल घेत महाराष्ट्र सरकारने त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. तसेच त्यांची बदली मुंबई महापालिकेतून पाणी पुरवठा विभागात करण्यात आली आहे.
चौधरींचे ट्वीट तसे १७ मे रोजीचे आहे. महात्मा गांधी यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र आता ज्या रस्त्यांना, संस्थांना गांधींचे नाव दिले ते काढण्यात यावे, जगभरातील त्यांचे पुतळे पाडण्यात यावेत. एवढेच नाही तर नोटांवरूनही त्यांचा फोटो काढून टाकावा हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. ३० जानेवारी १९४८ साठी थँक्यू गोडसे! असे त्यांचे मूळ ट्वीट आहे.

Post a Comment