हवाई दलाचे विमान बेपत्ता

माय नगर वेब टीम 
नवी  दिल्ली
भारतीय हवाई दलाटचे एएन -32 हे विमान गेल्या तीन तासांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. या विमानाने दुपारी 12.25 मिनिटांनी आसाममधील जोरहाट हवाई तळावरून अरुणाचल प्रदेशमधील अॅडवांस लँडिंग ग्राउंड मेचुकासाठी उड्डाण घेतले होते. दुपारी 1 च्या सुमारास या विमानाचा नियंत्रण कक्षाशी अखेरचा संपर्क झाल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या तीन तासांपासून एएन -32 हे विमान बेपत्ता असून याचा शोधकार्य सुरू आहे. या विमानात आठ 8 कर्मचारी आणि 5 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हवाई दलाने सुखोई-30 आणि सी-130 स्पेशल ऑप्स विमाने शोधमोहिमेसाठी रवाना केली आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post