
माय नगर वेब टीम
मुंबई - राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन येत्या १७ तारखेला सुरु होणार आहे. मात्र हे अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवायच होण्याची शक्यता आहे. कारण भाजपमध्ये जाणाच्या मार्गावर असलेल्या विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते कार्यालयातील सामानाची आवराआवर सुरू केली आहे.
काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता विखे यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकांनाही विधिमंडळातील विरोधी पक्षनेते कार्यालयाच्या कामाच्या जबाबदारीतून रिक्त होण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे हे या अधिवेशनात विरोधी पक्ष नेताचं नसणार आहे.त्यामुळे विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नेमणूक कधी करायची याचा निर्णय आता सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांवर अवलंबून आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीपासून विखे आणि कॉंग्रेस पक्षामध्ये काहीशी फुट पडली आहे.त्याच पार्श्वभूमीवर सुजय विखे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश करत लोकसभा निवडणूक लढवली. तर आता राधाकृष्ण विखे-पाटील हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे यासाबंधीचे संकेत खुद्द भाजप नेत्यांनीच दिले आहेत. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विखेंच्या भाजप प्रवेशाबाबत शक्यता वर्तवली आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, असे ते म्हणाले आहेत.
Post a Comment