माय नगर वेब टीम
अहमदनगर
आपल्या आवडत्या व्यक्तीच्या स्मृती कायम स्मरणात राहावा यासाठी ग्रामीण भागात प्रथमच वर्ष श्राद्ध निमित्त नेत्ररोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथील आसाराम बापूसाहेब खेंगट यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध निमित्त त्यांचे नातू वैभव यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात सुमारे ३८० रुग्ण तपासण्यात आले.
ग्रामीण भागात वर्ष श्रद्धा निमित्त किर्तन आयोजित करून नातेवाईक व परिचितांना बोलावले जाते. त्यांना मिष्टान्न जेवण दिले जाते परंतु बाबुर्डी बेंद येथील वैभव खेंगट यांनी आपल्या आजोबांच्या स्मृतीप्रित्यर्थ आनंदऋषी हॉस्पिटल येथील नेत्रपेढी चे शिबिर आयोजित केले होते. वर्ष श्राद्ध निमित्त किर्तन अधिष्ठान भोजन तर होतेच परंतु आलेल्या रुग्णांना तपासणी तसेच या तपासणीतून त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे आहे. अशा रुग्णांचा खर्च वैभव यांनी आजोबांच्या स्मृतीनिमित्त केला आहे. या शिबिरासाठी माजी सरपंच सुनील खेंगट, बाळासाहेब खेंगट यांनी परिश्रम घेतले. आनंदऋषी हॉस्पिटल चे डॉक्टर ऋषी कवडे यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरातून ३२ रुग्णांवर डोळ्यांचे ऑपरेशन केले जाणार आहे तर 82 रुग्णांना चष्मा वाटप करण्यात येणार आहे. चष्मा खरेदी साठी लागणारी किंमत ऑपरेशन साठी लागणारी सातशे रुपये प्रति रुग्ण फी वैभव यांनी दिली आहे. बाबुर्डी बेंद परिसरातील खडकी, वाळकी, सारोळा कासार, राळेगण, गुंडेगाव, देऊळगाव सिद्धी, घाेसपुरी, वाडी गावातील रुग्णांचा आजच्या शिबिरात सहभाग होता. ग्रामीण भागात प्रथमच वर्ष श्राद्ध निमित्त अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या उपक्रमाचे परिसरातून कौतुक केले जात आहे. आजच्या शिबिरास राजकीय शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.
दरम्यान सामाजिक उपक्रम राबविण्यात आणि गोर गरिबांना मदत करण्यात आनंदच वेगळा असतो असे पद्मावती पेट्रोल पंपाचे संचालक वैभव खेंगट यांनी सांगितले.

Post a Comment