World Cup 2019 IND vs NZ : भारत-न्यूझीलंड सामन्यात पावसाचा विजय; सामना रद्द




माय नगर वेब टीम
इंग्लंड - २०१९ विश्वचषक स्पर्धेत भारत विरूद्ध न्यूझीलंड सामना अखेर पावसामुळे रद्द करण्यात आला. सामना रद्द झाल्यामुळे दोनही संघांना १-१ गुण देण्यात आला. पावसामुळे रद्द झालेला हा आठवड्यातील तिसरा तर स्पर्धेतील चौथा सामना आहे. या १-१ गुणामुळे न्यूझीलंड ४ सामन्यांत ७ गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे, तर भारतीय संघ ३ सामन्यांत ५ गुणांसह तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.
आजचा सामना हा नॉटिंगहॅमच्या मैदानावर होणार होता. कालपासूनच या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानुसार नाणेफेकीच्या नियोजित वेळेच्या आधीपासूनच पावसाने जोर धरला होता. भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वा. ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खेळपट्टीची पाहणी आणि पावसाचा अंदाज घेण्यात आला. पण अखेर पावसाचाच जय झाला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post